गारद फाऊंडेशन, Glory of Humanity ह्या युवकांच्या संस्थेने ३ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात मिशन भरारी ह्या उपक्रमाचे आयोजन केले.
गारद फाऊंडेशन, Glory of Humanity ह्या युवकांच्या संस्थेने ३ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात मिशन भरारी ह्या उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमांतर्गत १० जिल्हापरिषद शाळांतील २२० हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वितरित केले.
Activities and Highlightst :
उद्दिष्ट होते की, शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून त्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणे. भोर तालुक्यातील गरीब व हातावर पोट असलेल्या पालकांच्या मुलांसाठी हा उपक्रम आयोजित केला गेला. या उपक्रमासाठी जनतेकडून देणग्या गोळा करून १०० हून अधिक दानशूर व्यक्तींच्या मदतीने शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.
सहकार्य व दान देणाऱ्यांमुळे ही मोहिम यशस्वी झाली. शंभरहून अधिक देणगीदार व सहकाऱ्यांनी आपले योगदान दिले. भोर तालुक्यातील घोलप आवाड शाळेचे शिक्षक गीतराम गावडे व चिखलावडेवाडी शाळेचे शिक्षक शिंगोटे सर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात गारद फाऊंडेशनचे सदस्य अभिषेक नेमाणे, प्रसाद कुवर, सागर जेधे, साहिल मिराशी, जयंत गाडगीळ, अंकिता जाधव व अन्य सदस्य उपस्थित होते.
गारद फाऊंडेशन च्या मिशन भरारी मोहिमेने २२० विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणले.